चिमुरड्या मुलींवर शाळेत अत्याचार, बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, Photo's
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. (Photo Credit-ABP Majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळपासूनच नागरिकांनी शाळेला घेरा घातला असून बदलापूर स्थानकात रेल रोको देखील केला आहे. (Photo Credit-ABP Majha)
चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. (Photo Credit-ABP Majha)
मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, पोलिसांनी देखील आवाहन केलं, मात्र तरीदेखील नागरिक आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही.(Photo Credit-ABP Majha)
सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit-ABP Majha)
अशातच आता चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. (Photo Credit-ABP Majha)
बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. (Photo Credit-ABP Majha)
मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहेस असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.(Photo Credit-ABP Majha)
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Photo Credit-ABP Majha)
संबंधित संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Photo Credit-ABP Majha)
अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील, जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (Photo Credit-ABP Majha)
बदलापूरमधील या संतापजनक घटनेवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Photo Credit-ABP Majha)
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Photo Credit-ABP Majha)
या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. (Photo Credit-ABP Majha)
दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. (Photo Credit-ABP Majha)
तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Photo Credit-ABP Majha)