IN PICS | श्रीदेवींपासून नीना गुप्तांपर्यंत, लग्नाआधीच गरोदर होत्या सेलिब्रिटी
प्रियकर गाय हर्षबर्ग याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच अभिनेत्री कल्की केक्ला हिनं गरोदरपणाचं वृत्त जाहीर केलं. तिनं फेब्रुवारी 2020 मध्ये एका मुलीला जन्म दिला. (छाया सौजन्य- @kalkikanmani/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2006 मध्ये जेव्हा व्यावसायिक बॉबी मुखर्जीशी महिमा चौधरी विवाहबंधनात अडकली तेव्हा ती 5 महिन्यांची गरोदर होती असं सांगितलं जातं. (छाया सौजन्य- @mahimachaudhry1/Instagram)
अभिनेत्री कोंकणा सेन हिनं अभिनेता रणवीर शौरी याच्याशी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. कोंकणाही लग्नापूर्वीच गरोदर होती. मार्च 2011 मध्ये तिनं एका मुलाला जन्म दिला. (छाया सौजन्य- @konkona/Instagram)
श्रीदेवी जेव्हा निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाहबंधनात अडकल्या तेव्हा त्या पहिल्यांदाच 7 महिन्यांच्या गरोदर होत्या असं म्हटलं जातं. (छाया सौजन्य- @sridevi.kapoor/Instagram)
श्रृती हसन या आपल्या मुलीच्या जन्मानंतर जवळपास 2 वर्षांनी अभिनेत्री सारिका यांनी दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते कमल हासन यांच्याशी लग्न केलं. सारिका यांना श्रृती आणि अक्षरा अशा दोन मुली आहेत. (छाया सौजन्य- Getty Images)
क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट देण्याचं नाकारलं आणि इथं अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांची मुलगी मसाबा हिचं एकल पालकत्त्व स्वीकारलं. मसाबा ही एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. (छाया सौजन्य- @neena_gupta/Instagram)
गायिका ( Neha kakkar ) नेहा कक्कर हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोचो काय पोस्ट केला, तिच्या गरोदरपणाच्या चर्चांनी पाहता पाहता कमालीचा वेग धरला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये नेहानं ही पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं. याच निमित्तानं कलाविश्वात विवाहबंधनात अडकण्यापूर्वीच मातृत्त्वाची चाहूल लागलेल्या काही सेलिब्रिटींच्या नावाचीही चर्चा सुरु झाली. या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री श्रीदेवी, ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासह आणखीही काही नावांचा समावेश आहे.
मागील वर्षीच अभिनेत्री एमी जॅकसन हिनं प्रियकर George Panayiotouशी साखरपुडा केला. या जोडीनं सप्टेंबर 2019मध्ये त्यांच्या मुलाचं या जगात स्वागत केलं. (छाया सौजन्य- @iamamyjackson/Instagram)
यंदाच्याच वर्षी गायिका नेहा कक्कर हिनं ऑक्टोबर महिन्यात रोहनप्रीत सिंह याच्याशी लग्न केलं. ज्यानंतर नुकताच तिनं एक फोटो पोस्ट केला. या फोटोमुळंच तिच्या (लग्नापूर्वीच्या) गरोदरपणाच्या चर्चांना वाव मिळाला. मुख्य म्हणजे नेहा किंवा रोहनप्रीतनं मात्र याबाबत अद्यापही अधिकृत वक्तव्य किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. (छाया सौजन्य- @nehakakkar/Instagram)
अभिनेत्री नेहा धुपिया हिसुद्धा लग्नाआधीच गरोदर होती, असं म्हटलं जातं. (छाया सौजन्य - @nehadhupia/Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -