Vacation Mode On | हजारो गरजवंतांना मदत करणारा सोनू सूद अखेर सुट्टीवर
सातत्त्यानं इतरांसाठी धावपळ करणारा हा अभिनेता सध्या निवांत असल्याचं पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूत्रांच्या माहितीनुसार सोनू सध्या अलिबागमध्ये त्याच्या बालपणीच्याच मित्रमंडळींपैकी एकाच्या व्हिलावर सुट्टी व्यतीत करत आहे.
मागील बऱ्याच महिन्यांपासून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या स्वगृही पाठवत, भुकेलेल्यांना अन्नदान करत आणि शक्य त्या सर्व परिंनी गरजवंतांच्या मदतीला धावत असणारा अभिनेता सोनू सूद आता स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ देत आहे.
बरं, हा अभिनेता सुट्टीवर असला तरीही तिथंही फिटनेसकडे मात्र तो दुर्लक्ष करत नाहीये.
पत्नीसोबतचे सोनूचे सोशल मीडियावरील फोटो याचीच प्रचिती देत आहेत.
बऱ्याच काळानंतर अभिनेता सोनू सूद त्याच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करताना दिसत आहे.
कोरोना काळात हजारो गरजूंना सढळ हस्ते मदत करणारा हा अभिनेता पत्नीसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -