बॉलिवूडच्या 'या' 6 चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर येणार वादळ; संपुष्टात येईल साऊथ सिनेमांचं वर्चस्व
2024 मध्ये, कल्की 2898 एडी आणि पुष्पा 2 सारख्या चित्रपटांनी वर्चस्व गाजवलं आहे. या दक्षिणेकडील चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत बॉलिवूडलाही मागे टाकलं आहे. दरम्यान, हे वर्ष बॉलिवूडचं वर्ष असणार आहे, कारण या वर्षी सलमान, शाहरुख आणि हृतिक रोशन, सनी देओल सारखे स्टार्स त्यांचे चित्रपट घेऊन येणार आहेत. गेलं वर्ष साऊथ मू्ह बॉलिवूडला पुन्हा एकदा त्याचं वर्चस्व मिळवून देऊ शकणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2024 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी धमाकेदार होतं, काही चित्रपट प्रेक्षकांना आवडले, तर काही चित्रपट चाहत्यांनी नाकारले. आज आपण 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या 6 चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.
टायगर श्रॉफचा 'बागी 4' हा चित्रपटही यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगरसोबत संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू दिसणार आहेत.
सनी देओल स्टारर 'लाहोर 1947' हा चित्रपट यावर्षी स्वातंत्र्यदिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत प्रिती झिंटा देखील दिसणार आहे. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
या वर्षी एप्रिल महिन्यात सनी देओल पुन्हा एकदा खळबळ माजवणार आहे. अलिकडेच, अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि शुटिंग जवळजवळ संपल्याची माहिती दिली. या चित्रपटाचं नाव 'जाट' आहे, ज्याचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आहेत. या चित्रपटात चाहत्यांना धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळेल.
यावर्षी बॉलिवूडचा भाईजानही मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 2025 च्या ईदमध्ये सलमान खान त्याच्या चाहत्यांना 'सिकंदर' हा चित्रपट भेट देणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये सलमान खानचा पहिला लूक लोकांना आवडला होता.
किंग खानचा 'किंग' हा चित्रपटही यावर्षी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांचा हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहे.
यशराजच्या स्पाई यूनिवर्समधील आणखी एक चित्रपट, 'वॉर 2' या वर्षी 14 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत ज्युनियर एनटीआर देखील दिसणार आहे.