सैनिकांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा 'फौजी' चित्रपट लवकरच सिनेमागृहात
abp majha web team
Updated at:
15 Aug 2024 01:28 PM (IST)

1
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
देशाचे जवान आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असतात, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. अशाच जवानांच्या शौर्यगाथेवर आधारित 'फौजी' हा चित्रपट आहे.

3
सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य फौजी चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.
4
'फौजी'चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशान येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा आणि संकलन विश्वजीत यांचे आहे.
5
'फौजी' मराठी चित्रपट 30 ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार यांचं संगित आणि उमेश रावराणे, सूरज कुमार यांनी पार्श्ववसंगित दिलं आहे.