In Pics | Wedding shoot च्या निमित्तानं नीना गुप्तांच्या लेकीचा अनोखा थाट
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी कायमच काही अफलातून डिझाईन्स त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून किंवा मग नवनवीन कलेक्शनच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळीसुद्धा त्यांनी असेच काही कलेक्शन्स सर्वांच्या भेटीला आणले आहेत. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे सध्या सुरु असणारी लग्नसराई आणि त्याच धर्तीवर Condé Nast Traveler या लोकप्रिय मासिकाची खास आवृत्ती.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या लेकीनं या खास फोटोशूटमध्ये यावेळी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
कायमच इतरांसाठी नवनवे लूक डिझाईन करणाऱ्या मसाबानं यावेळी सब्यसाचीच्या कलेक्शनसाठी मॉडेलिंग केलं आहे.
नववधूच्या लूकमध्ये तिनं कुठं अतिशय सुरेख असा लेहंगा परिधान केला आहे, तर कुठे मोठाल्या फुलांची चित्र असणारी फ्लोरल डिझाईनची साडीही सराईतपणे नेसली आहे.
मसाबाचे हे लूक आणि तिचं एका अग्रगणी मासिकासाठी करण्यात आलेलं हे फोटोशूट सध्या कलाविश्वात बरंच गाजतंय.
फक्त वेशभूषेच्याच बाबतीत नव्हे, तर या फटोशूटच्या निमित्ताने स्पेशल एडिशन असणारे दागदागिनेही पाहण्याची संधी सर्वांना मिळत आहे. (सर्व छायाचित्रे- sabyasachiofficial/ इन्स्टाग्राम)