Video : वनपीसमध्ये 'शालू'चा धमाल डान्स! राजेश्वरी खरातचा अंदाज पाहून चाहते घायाळ!

राजेश्वरी खरात (Photo Source- Rajeshwari Kharat Facebook)
1/8
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी गाजली.
2/8
साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
3/8
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
4/8
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.
5/8
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/8
तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
7/8
विशेष म्हणजे ती अनेकदा चाहत्यांच्या कमेंटवर देखील उत्तरं देताना दिसते. चाहते जर तिला ट्रोल करत असतील तर ती अगदी प्रेमाने टोलेबाजी करताना देखील पाहायला मिळते.
8/8
सध्या राजेश्वरीचे चॉकलेट रंगाच्या ड्रेसमधील एक गाण्यावर नृत्य करताना व्हिडीओ व्हायरल झालाय. हे सर्व फोटो राजेश्वरी खरातच्या सोशल मीडियावरुन घेण्यात आलेले आहेत.
Published at : 18 Jun 2021 05:21 PM (IST)