Social Media Influencers: हे आहेत सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर, जे कोटींत कमाई करतात, कुणाची संपत्ती किती?
सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे. तुम्ही पाहत असाल की, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्युबवर असे काही इन्फ्लूएन्सर्स आहेत जे व्हिडीओ स्क्रोल करताच त्यांचे व्हिडीओ दिसायला सुरूवात होते. अर्थात जे कंटेट तयार करण्याचं काम करतात त्यांनाही खूप परिश्रम घ्यावे लागतात. परंतु इथं कंटेटवर जितक जास्तीत जास्त काम केलं जाईल, तितकी जास्त कमाई करता येऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाईफस्टाईल, मोटिवेशनल स्पीकर, कॉमेडी, ट्रॅव्हल आणि ब्युटीशियन यासह इतर अनेक क्षेत्रात काही इन्फ्लूएन्सर्सनी सोशल मीडियावर आपला दबदबा निर्माण केला आहे. यांच्याबद्दल तरूणाईमध्येही प्रचंड क्रेजही पाहायला मिळते. अशाच काही प्रभावी कंटेट क्रिएटर्सविषयी आणि त्यांच्या एकूण संपत्ती उत्पन्नविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...
यातील पहिलं नाव भुवन बाम आहे. भुवन बाम आपल्या फनी शॉर्ट व्हिडीओजमुळे प्रसिद्धी झोतात आला. भुवनला BB Ki Vines या यूट्युब चॅनेलमुळे पॉप्युलॅरिटी मिळाली. त्याने एक संगीतकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यावेळी त्याला महिन्याला अवघे 5000 रूपये इतके पैस मिळत होते. DNA च्या एका रिपोर्टनुसार, सध्या व्हिडीओज आणि त्याचा ब्रँड कोलाबच्या माध्यमातून भुवनची जवळपास 122 कोटी रूपये इतकी संपत्ती आहे.
प्राजक्ता कोळी - सोशल मीडियावर 'मोस्टली सेन' या नावानं प्रसिद्ध आहे. प्राजक्ताने एक रेडियो जॉकी म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.आता ती भारताची सर्वांत ओळखीचा चेहरा बनली आहे. ती फक्त सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरशिवाय सिनेमे आणि वेब सिरीजमध्ये दिसून आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सध्या प्राजक्ता जवळपास 16 कोटी रुपयांची मालकीन आहे
कुशा कपिला- कुशा पहिल्यांदा फेसबुकसाठी कंटेट रायटर होती. iDiva या फेसबुक पेजसाठी ती कंटेट लिहिण्याचं काम करत होती. यानंतर तिने फुल टाईम कंटेट क्रिएटर म्हणून काम करायला सुरूवात केली. मसाबा मसाबा 2 या वेब सिरीजमध्येही कुशाने अभिनय केला आहे. Zee च्या रिपोर्टनुसार, कुशाची एकूण संपत्ती 20 कोटी रूपये इतकी आहे.
अजेय नागर - सध्या सोशल मीडियावर Carryminati या नावानं प्रसिद्ध आहे.Carryminati आपल्या विनोदी आणि हटके व्हिडीओ कंटेटमुळे नेहमी चर्चेत असतो. तो आपल्या युट्युब व्हिडीओ आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून पैसे कमावतो. फायनान्शियल एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, अजेय नागरची एकूण संपत्ती 41 कोटी रूपये इतकी आहे.
यूट्युबर रणवीर अलाहबादिया - सध्या सोशल मीडियावर बीअर बायसेप्स म्हणून रणवीर प्रचंड फेमस आहे. यासोबत सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आणि मांक एंटरटेनमेंटचा सह-संस्थापक आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, रणवीरची एकूण संपत्ती 58 कोटी रुपये इतकी असल्याचं समोर आलं आहे.