राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचं बारसं पार पडलं; बाळाचं नाव काय ठेवलं माहितीये?
राम चरण आणि उपासना हे काही दिवसांपूर्वी आई-बाबा झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम चरण आणि उपासना यांच्या मुलीचे नाव कलिन कारा कोनिडेला असं ठेवण्यात आलं आहे.
नुकतेच उपासना आणि राम चरण यांच्या मुलीचं बारसं पार पडलं. या नामकरण सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
उपासना आणि राम चरण यांनी त्यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
उपासनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या मुलीच्या नावाचा अर्थ सांगितलं आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'ललिता सहस्रनाम मधून घेतलेले हे नाव एक परिवर्तनकारी, शुद्ध करणारी ऊर्जा दर्शवते ज्यामुळे आध्यात्मिक जागृकता निर्माण होते.'
राम चरण आणि उपासना लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत.
राम चरण आणि उपासना हे 20 जून 2023 रोजी आई-बाबा झाले आहेत.
राम चरण आणि उपासना एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.