Divya Agarwal : घटस्फोटाच्या दिव्याने चर्चांना अखेर दिला पूर्णविराम; म्हणाली..
अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने फेब्रुवारी महिन्यात मराठमोळ्या अपूर्व पाडगांवकरसोबत (Apurva Padgaonkar) लग्नगाठ बांधली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण हनिमूनवरुन परतताच दिव्याने अपूर्वसोबतचे सगळे फोटो तिच्या सोशल मीडियावरुन काढून टाकले.
त्यामुळे दिव्या आणि अपूर्वमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. इतकच नव्हे तर आता दे दोघे घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण य सगळ्यवर दिव्याने भाष्य करत या सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिलाय.
दरम्यान दिव्यासह अपूर्वने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन दिव्यसोबतचे काही फोटो डिलीट केले होते. त्यामुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला.
दिव्या आणि अपूर्वने महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये अगदी घरीच लग्न केलं होतं.
त्यानंतर दिव्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गुढीपाडव्याचेही फोटो शेअर केले होते. पण आता दिव्याने ते फोटोही डिलीट केले आहेत.
दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत याविषयी भाष्य केलं आहे. दिव्याने म्हटलं की, मी कोणताही गोंधळ न करता, कोणतीही कमेंट न करता माझ्या सोशल मीडियावरुन 2500 फोटो डिलीट केलेत.
पण माझ्या लग्नाचे फोटो डिलीट झाल्यावरच सगळीकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मी कायम अशाच गोष्टी केल्या आहेत, ज्याांची माझ्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती. पण आता त्यांनी अपेक्षा काय आहे, घटस्फोट किंवा मूल. यापैकी काहीही होणार नाहीये.
पुढे दिव्याने म्हटलं की, खरंतर मला माझ्या प्रोफाईलवर मी पीन केलेल्या पहिल्या पोस्टविषयी इथूनपुढे बोलायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट हा गोड असतो आणि देवाच्या कृपेने माझा नवरा अगदी माझ्या शेजारीच आहे. त्यामुळे दिव्याने तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला असल्याचं पाहायला मिळतंय.
दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हिने 20 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्रीयन पद्धतीने अपूर्व पाडगांवरसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती.
मोजक्या नातेवाईंकाच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (pc:divyaagarwal_official/ig)