in Pics : दिशा पटानीपासून रश्मिका मंदान्नापर्यंत या सौंदर्यवतींना लोकांनी दिली 'नॅशनल क्रश'ची पदवी
काहींनी आपल्या नजरेने बाण मारले तर काहींनी आपल्या किलर लूकने चाहत्यांना घायाळ केले. या अभिनेत्रींची नाव एका रात्रीत चमकली. यासाठीच चाहत्यांनी त्यांना नॅशनल क्रश ही पदवी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत दिशा पटानीचाही समावेश आहे. दिशा आजही इंटरनेट सेन्सेशन आहे. ती बर्याचदा बिकिनी लूक्समध्ये दिसली आहे, मात्र जेव्हापासून तिने तिचा देसी लूक दाखवला आहे तेव्हा तिने चाहत्यांना वेड लावले आहे.
दिल बेचारा चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबतच्या संजना संघीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. या दरम्यान तिच्या चाहत्यांनी तिला नॅशनल क्रश ही पदवी दिली.
मायाची भूमिका साकारून जेनिफर विंगेटने तिच्या सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर अशा प्रकारे खेळवली की तिला पाहणाऱ्या चाहत्यांच्या नजरा तिच्याशिवाय इतर कोणावरही खिळल्या नाहीत.
पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची फॅन फॉलोईंग चांगलीच आहे. तिचे बोलके डोळे आणि तिची स्माईल आणि तिचं एकंदरीत सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं.
सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटात बॉम डिग्गी डिग्गीवर डान्स करून साक्षी मलिकने तिच्या सेक्सी मूव्हने सर्वांना घायाळ केले होते.
विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर देखील कोणापेक्षा कमी नाही. नजरेने बंदुक झाडणाऱ्या या अभिनेत्रीने सगळ्यांनाच घायाळ केले आहे. प्रियाच्या लाखो चाहत्यांनी तिला रातोरात फॉलो केले.
या यादीत शर्ली सेटियाच्या नावाचाही समावेश आहे. तिच्या सौंदर्या बरोबरच तिच्या मधुर आवाजानेही चाहत्यांना प्रभावित केले आहे.