PHOTO: प्रीती झिंटाच्या आयुष्यातल्या ‘या’ रहस्यमयी गोष्टी माहितीयेत का?
बॉलिवूडची ‘बबली गर्ल’ अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) आज (31 जानेवारी) तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रीती मुळची शिमला आहे. प्रीती फारशी वादात अडकली नाही, पण प्रीतीचा अपघातांशी मात्र खोलवर संबंध आहे. प्रीती झिंटाच्या वडिलांचाही अपघाती मृत्यू झाला होता.
ज्याचा प्रीतीच्या मनावरही खोल परिणाम झाला. लहानपणी वडिलांसोबत झालेला अपघात प्रीती वयानुरूप विसरली. पण, ती स्वतःही अनेकदा अपघातांना बळी पडली होती. या अपघातांमध्ये प्रीती झिंटा थोडक्यात बचावली.
प्रीती झिंटाने स्वतः तिच्यासोबत झालेल्या अपघातांबद्दल सांगितले होते. प्रीती 2004मध्ये त्सुनामीमध्ये अडकली होती. त्सुनामीत प्रीतीने तिचे जवळचे मित्रही गमावले होते. त्यामुळे प्रीती खूप नैराश्यात गेली.
त्सुनामीचा हा कहर प्रीतीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. या अपघाताबाबत बोलताना प्रीती म्हणाली होती की, 'त्या सुनामीत मी मृत्यूच्या अगदी जवळ होते.'
या घटनेनंतरच प्रीती इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामील झाली. मात्र, या घटनेपूर्वीच प्रीतीने स्वत:च्या डोळ्यांनी अपघात होताना पाहिला होता. या घटनेतही प्रीती थोडक्यात बचावली होती. हा अपघात 2004 मध्येच झाला होता.
प्रीती झिंटाने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
शाहरुख खानसोबतचा 'दिल से' हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटापासून प्रीतीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रीतीच्या प्रमुख चित्रपटांमध्ये 'सोल्जर', 'क्या कहना', 'कल हो ना हो', 'सलाम नमस्ते', 'वीर झारा', 'संघर्ष' यांचा समावेश आहे. (all photo: priety zinta instagram )