स्वप्नीलची 'साईशा'; सौंदर्य पाहून नेटकरी, सेलिब्रिटीही घायाळ

आपल्या भावना आणि नैसर्गिकरित्या मिळालेली ओळख या गोष्टींबाबतचं सत्य स्वीकारत, मुळात स्वत:ला स्वीकारत सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
(सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम/ officialswapnilshinde)

स्वप्नील शिंदे नव्हे, तर साईशा शिंदे अशी त्यांची नवी ओळख असेल. शिंदे यांनी या नव्या रुपाची आणि नव्या जीवनाचीच माहिती सर्वांना दिल्यानंतर त्यांच्या या रुपानं नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींनाही घायाळ केलं. इतकंच नव्हे तर त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुकही करण्यात आलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपण गे पुरुष नसल्याची बाब स्पष्ट करत यापुढं आपण एक ट्रान्सवुमन असू असं त्यांनी सांगितलं.
साईशा शिंदे, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर या नावाची आणि या चेहऱ्याची बरीच चर्चा आहे. ही चर्चा होण्याचं कारणंही तसंच आहे. कारण, याच साईशाला काही दिवसांपूर्वी अनेकजण स्वप्नील शिंदे या नावानं ओळखत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -