US Capitol | अमेरिकेत अभूतपूर्व संत्तासंघर्ष; ट्रम्प समर्थकांचा संसदेत घुसून धुडगूस
अमेरिकेत ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या गदारोळानंतर वॉशिंग्टनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.
गर्दी संसदेच्या आतमध्ये घुसली आणि एक समर्थन थेट जाऊन उपराष्ट्रपतींच्या खुर्चीवर जाऊन बसला.
ट्रम्प यांचे समर्थक संसदेत घुसले. जिथे दोन्ही सभागृहांमध्ये नव्या राष्ट्रपती निवडणुकांच्या निकालांबाबत वाद सुरु होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली गर्दी पाहता पाहता आक्रमक होऊ लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कॅपिटल हिल्सचा परिसर सील केला. परंतु, त्यानंतर गर्दी वाढतच गेली.
बुधवारी कॅपिटल हिल्स येथे मोठ्या प्रमाणावर ट्रम्प समर्थक एकत्र आले होते.
अमेरिकेच्या 300 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी असं कधीच झालेलं नाही. निवडणूकीत पराभूत झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करण्यास नकार दिला आणि त्याच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेला घेराव घातला.
संसदेत हिंसा करणाऱ्या समर्थकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले की, मी अमेरिका कॅपिटलमध्ये सर्वांना शांती राखण्याचं आवाहन करतो. हिंसा करु नका. लक्षात ठेवा, आपला पक्ष कायदा आणि सुव्यवस्था राखणारा पक्ष आहे. कायदा आणि महान पुरुष व महिलांचा सन्मान करा. धन्यवाद!
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. संसदेत घुसलेल्या समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री देखील झाली. यावेळी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -