Harsha Richhariya Instagram: महाकुंभमेळ्यातील 'सर्वात सुंदर साध्वी' हर्षा रिछारिया; एका रात्रीत केली अशी कामगिरी की,...
खरं तर, सध्या महाकुंभातील एका साध्वीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. युजर्सनी तिला कुंभमेळ्यातील 'सर्वात सुंदर साध्वी' म्हणून टॅग दिला आहे. या साध्वीचे नाव हर्षा रिछारिया आहे. जी आता सोशल मीडिया क्वीन बनली आहे. तिचं फॅन फॉलोइंगही एका रात्रीत लाखोंवर पोहोचलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहर्षा रिछारिया 30 वर्षांची आहे आणि ती उत्तराखंडमध्ये राहाते. हर्षा ही आचार्य महामंडलेश्वरांचा शिष्य आहे.
हर्षा पूर्वी व्यवसायानं अँकर आणि अभिनेत्री होती. पण दोन वर्षांपूर्वी ती सगळं सोडून साध्वी बनली.
आता हर्षा रिछारिया, साध्वी असण्यासोबतच, एक सामाजिक कार्यकर्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे.
महाकुंभातील हर्षाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तिच्या सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ केलं आहे.
हर्षा रिछारियाचा इन्स्टा आयडी @host_harsha आहे. एक दिवसापूर्वी या अकाउंटचे सुमारे 6 लाख फॉलोअर्स होते आणि आज ते 10 लाखांवर पोहोचले आहेत.
साध्वी हर्षा रिछारिया ही मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातील रहिवासी आहे. जे आजकाल महाकुंभमेळ्याचा एक भाग आहेत.
इथूनच तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर कमेंट करत युजर्स तिच्या साधेपणाची आणि सौंदर्याची प्रशंसा करत आहेत.