त्या आल्या, बॉलिवुड गाजवलं, पण.., अशा चार अभिनेत्री ज्यांनी ग्लॅमर सोडून घेतला सन्यास!
बॉलिवुडमध्ये अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी सिनेसृष्टीत असताना आपला काळ गाजवला. मात्र मध्येच सगळं सोडून त्यांनी सन्यास, देवाच्या भक्तीचा मार्ग पकडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबरखा मदान हे नाव कधीकाळी बॉलिवुडमध्ये चांगलेच चर्चेत असायचे. त्यांनी 2003 मध्ये आलेल्या राम गोपाल वर्माच्या भूत या चित्रपटात काम केले होते. मात्र नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांनी बुद्धीस्ट भिक्खू होण्याचा निर्णय घेतला.
अनघा भोसले या अभिनेत्रीने अनुपमा या मालिकेत काम केले होते. मात्र आता या अभिनेत्रीने सन्यास घेतला असून ती देवाच्या भक्तीत रमलेली आहे.
ममता कुलकर्णी हे नाव तर सर्वांनाच माहिती आहे. या अभिनेत्रीने अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले.मात्र त्यांनी कधीकाळी सन्यास घेतला होता. त्यांनी 12 वर्षापर्यंत सन्यास घेतल्याचं म्हटलं जातं.
नीता मेहता या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग होता. मात्र त्यांनी सांसारिक सुखाचा त्याग करून सन्यास घेतला.