In Pics : अभिनेत्री अंकिता लोखंडेपासून गायक अभिजीत सावंतपर्यंत बिग बॉस 15 साठी ही नावं चर्चेत!
'खतरों के खिलाडी' फेम तेजस्वी प्रकाश देखील बिग बॉसच्या घरात दिसू शकते. परंतु, अद्याप तिचं नाव बिग बॉस कंटेस्टंट म्हणून निश्चित झालं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppImage Source Instagram @tejasswiprakash
Bigg Boss च्या पंधराव्या सीझनमध्ये चेन्नई एक्सप्रेस मधील थंगबली म्हणजेच अभिनेता निकितिन धीरला सामील होण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
बिग बॉसच्या पुढील सीझनसाठी 'नागीन' या मालिकेतील अभिनेत्री अदा खान हिचं नावदेखील यादीत असल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की बिग बॉस 15 साठी शो मेकर्सनी अभिनेत्री जेनिफर विंगेटशी संपर्क साधला आहे. जेनिफर विंगेटचे चाहते लाखोंच्या घरात आहेत. टीव्हीच्या जगातही या अभिनेत्रीची वेगळी ओळख आहे.
बिग बॉस सीझन 15 सुरू होण्यास अजून बराच कालावधी बाकी आहे पण निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे. सामान्य नागरिकांच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू केली आहे.
शो मेकर्सनी अंकिता लोखंडे हिला संपर्क साधला आहे. मात्र याबद्दल अद्याप निश्चित माहिती नाही. अंकिताचे चाहते तिला बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये जागा देण्याची मागणी करत आहेत.
'बिग बॉस 15' ने सेलिब्रिटी जोडप्यांकडे जाण्यासही सुरवात केली आहे.
इंडियन आयडल विजेता गायक अभिजीत सावंत यालाही या शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे.
Image Source Instagram @abhijeetsawant73