World Diabetes Day 2024 : अभिनेत्री समंथा ते सोनम कपूरपर्यंत, अनेक सेलिब्रिटी आहेत डायबिटीज पेशंट; यादी पाहा
आज 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन आहे. मधुमेह आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जगभरात 'जागतिक मधुमेह दिन' (World Diabetes Day) म्हणून साजरा केला जातो. जेव्हा आपल्या शरीरातील स्वादुपिंड योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करू शकत नाही, तेव्हा मधुमेह होतो. या आजाराचा रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मधुमेहींना दररोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक सेलिब्रिटीदेखील डायबिटीज पेशंट असून याचा प्रतिकार करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिटाडेल हनी बनी फेम अभिनेत्री समंथा रुथ प्रभू देखील मधुमेह आजाराशी लढत आहे. समंथा डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि तिच्या याची लक्षणे यांवर विशेष लक्ष ठेवून हा आजार नियंत्रणात ठेवते.
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर डायबिटीज पेशंट आहे. सोनम कपूर केवळ 17 वर्षांची असताना तिला टाईप-1 मधुमेह असल्याचं समोर आलं. आपल्या व्यस्त शेड्युलमधून ती मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी आहार घेते आणि नियमित व्यायाम करते.
प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांवर मात केली आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांनाही मधुमेह आजार आहे. त्यांनी आपली जीवनशैली बदलून आणि निरोगी आहाराचं पालन करून डायबिटी नियंत्रित ठेवला आहे.
साऊथ सुपरस्टार कमल हसन यांनाही टाइप-1 मधुमेह आहे. जिम वर्कआउट्स, अल्कोहोल टाळणे आणि योगासने करून अभिनेते कमल हसन रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला वयाच्या 17 व्या वर्षापासून टाइप 1 मधुमेह आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवादने जीवनशैलीमध्ये बदल केला, यासोबतच त्याला इन्सुलिनही घ्यावे लागते.
टीव्ही पर्सनॅलिटी आणि ॲंकर गौरव कपूर याला वयाच्या 22 व्या वर्षी मधुमेह झाल्याचं निदान झालं. गौरव कपूर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घेतो. तो शूटिंगच्या वेळी फक्त घरी बनवलेलं अन्न खातो आणि नियमित व्यायाम करणं चुकवत नाही.
हॉलिवूड गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास केवळ 13 वर्षांचा असताना त्याला टाइप 1 डायबिटीजचं निदान झालं. निरोगी आहार आणि नियमित ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टमसह निकस जोनास त्याचा टाइप 1 मधुमेह नियंत्रणात ठेवतो.