'या' पाच स्टॉक्सचा शेअर बाजारात धमाका! भविष्यात देणार 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स!

Stocks to BUY: मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने पाच स्टॉक्स गुंतवणुकीसाठी सूचवले आहेत. हे स्टॉक 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देण्याची शक्यता या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोतीलाल ओस्वाल या ब्रोकरेज फर्मने Powergrid हा शेअर खरेदी करताना 425 रुपयांचे टार्गेट दिले आहे. हा शेअर सध्या 315 रुपयांवर आहे.

Zomato या शेअरसाठी मोतीलाल ओस्वालने 330 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर सव्वा तीन टक्क्यांच्या तेजीसह 265 रुपयांवर आहे. ओस्वालने हे टार्गेट सध्याच्या मूल्याच्या तुलनेत 25 टक्के आहे.
REC Ltd हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला मोतीलाल ओस्वालने दिला आहे. त्यासाठी ब्रोकरेज फर्मने 630 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 505 रुपयांवर ट्रेड करतोय.
HCL Tech या कंपनीतही गुंतवणूक करण्याचा सल्ला मोतीलाल ओस्वालने दिला आहे. त्यासाठी 2300 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 1855 रुपयांवर ट्रेड करतोय.
Bank of Baroda या शेअरसाठी ब्रोकरेज फर्मने 290 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 244 रुपयांवर ट्रेड करतोय.