किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या
![किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/14/3825a03dff6dcf60c62d31830f0b3242948a3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
रॅपर बादशाह फक्त बॉलिवूडमधीलच नाही तर संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने अनेक रॅप गाणी दिली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/14/a9a8a19c3d9fe4aa8faecd62b3957e3c32781.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
बादशाह गाण्यांमुळे अनेकदा वादातही सापडला आहे. पण, एक वेळ अशी होती जेव्हा बादशाहला शाहरुख खानकडून महागडी भेट मिळाली होती.
![किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या किंग खानकडून रॅपर बादशाहसाठी महागडं गिफ्ट, काय आहे ती वस्तू जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/14/44f332b080b11871f87fdfd10830b46804e7e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
रजत शर्मा यांच्या शो 'आप की अदालत'मध्ये बादशाहने सांगितले की, तो किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. त्याच्यापासून प्रेरित होऊन त्याने स्वत:चं नाव बादशाह ठेवलं.
यावेळी बादशाहने सांगितलं की, जेव्हा त्याने शाहरुखसाठी काम केलं होतं, तेव्हा शाहरुखने त्याला फीच्या बदल्यात एक महागडी भेटवस्तू दिली होती.
बादशाहने सांगितलं की, शाहरुख खानच्या टीमने त्याला एक थीम साँग तयार करण्यास सांगितलं होतं. मी त्यांच्यासाठी एक गाणं तयार केलं आणि त्यांना ते खूप आवडलं. यानंतर त्यांची मॅनेजर रुपा माझ्याकडे आली आणि मला माझ्या फीबद्दल विचारलं.
याबाबत बादशाह म्हणाला की, मी फी घेण्यास नकार दिला आणि मला शाहरुख खानसाठी काम करण्याची संधी मिळाली, हेच भाग्य असल्याचं सांगितलं. हाच माझ्यासाठी आशीर्वाद असून ते माझ्यासाठी पुरेसं आहे, असं त्याने टीमला सांगितलं.
बादशाहने सांगितलं की, त्या काळात मला नवीन प्ले स्टेशन 5 हवं होतं, ते त्यावेळी लाँच झालं होतं आणि पण भारतात आलं नव्हतं.
त्याने पुढे सांगितलं की, एका आठवड्यानंतर मला शाहरुख सरांचा मेसेज आला. तुझं सामान घरी पडून आहे, ते कुठे पाठवायचं ते सांग, असं त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं.
मी त्यावेळी त्यावर शाहरुख सरांचा ऑटोग्राफ घ्यायलाही विसरलो. शाहरुख सरांना माझ्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. आमच्यासाठी तेच पुरेसे आहेत.
शाहरुख खानच्या टीमने 2020 मध्ये बादशाहला आयपीएल फ्रेचायझी कोलकाता नाईट रायडर्ससाठी थीम साँग तयार करण्यास सांगितलं होतं. हे फॅन अँथमही त्यावेळी खूप आवडलं होतं.