Chhawa Movie: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार महत्वाची भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती

विकी कौशलचा छावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छावा या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.

विकीच्या या चित्रपटात रश्मिका मंदन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकू शकतात.
अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्यानं छावा या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संतोषनं फोटोला कॅप्शन दिलं, जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराजकी जय , जय भवानी,छावा ह्या सिनेमात काम करण्याची संधी मिळणं हा मी राजांचा आशीर्वादच मानतो.
संतोष जुवेकरनं एका क्लॅप बोर्डचा शेअर केला आहे. ज्यावर 'छावा' असं लिहिलेलं दिसत आहे.
लवकरच ही कलाकृती राजांच्या चरणी अर्पण करू. मालक तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असूदे., असंही संतोषनं पोस्टमध्ये लिहिलं.