Health Tips : दीर्घकाळ होणारा खोकला काही गंभीर आजारांचं लक्षण? वाचा सविस्तर
खोकला सहसा 1-2 आठवड्यांच्या आत स्वतःच सुटतो. परंतु खोकला 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालू राहिल्यास ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हायरल इन्फेक्शन : व्हायरल इन्फेक्शन हे दीर्घकाळ टिकणाऱ्या खोकल्याचे सर्वात सामान्य कारण आहे. जेव्हा आपल्याला सामान्य सर्दी आणि खोकला होतो तेव्हा विषाणूमुळे व्हायरल इन्फेक्शन होते.
बॅक्टेरियाचा संसर्ग : कधीकधी बॅक्टेरियामुळे खोकला दीर्घकाळ टिकू शकतो. ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया सारख्या फुफ्फुसातील जिवाणू संसर्ग आपल्याला 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ त्रास देऊ शकतात.
दमा : दम्यामध्ये सतत 3-4 आठवडे अधूनमधून खोकला येतो. छातीत घट्टपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
ऍलर्जी : अनेकांना आजूबाजूच्या वातावरणाची ऍलर्जी असते. जसे की, धुळीचे कण, प्राणी तसेच पक्ष्यांचे केस इ. कधीकधी ऍलर्जीमुळे होणारा खोकला अनेक आठवडे टिकतो.
गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग: गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग म्हणजेच जीईआरडी हा खोकला आणि आम्लपित्ताचे एक सामान्य कारण आहे. जेव्हा पोटातील आम्ल आणि पाचक रस घशात प्रवेश करतात, ज्यामुळे सतत खोकला आणि छातीत जळजळ होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.