Mohit Raina Wedding : 'देवों के देव महादेव' फेम मोहित रैनाही अडकला विवाहबंधनात, पाहा लग्नामधील खास क्षण
Mohit Raina Wedding : 'देवों के देव महादेव' मालिका फेम अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लपूनछपून लग्न करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मोहित रैनाने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.(सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहित रैनाने 2022 च्या पहिल्या दिवशी आपल्या लग्नाबद्दल सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मोहितने अदितीसोबत सात फेरे घेतले आहेत. (सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)
मोहित रैनाने लग्नाचे फोटो शेअर करून एक पोस्ट लिहून त्याच्या आणि अदितीच्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत. (सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)
'उरी : द सर्जिकल स्ट्राईकट या चित्रपटातही मोहितने विकी कौशलसोबत काम केले आहे. (सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)
मोहितने 'देवों के देव महादेव' मालिकेमध्ये त्यांनी भगवान शंकराची भूमिका साकारली होती. याशिवाय मोहितने 'बंदिनी', 'चेहरा' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट' मालिकांमध्येही काम केले आहे. (सौजन्य - मोहित रैना इंस्टाग्राम)