Mrunal Thakur Corona Positive : जर्सी फेम मृणाल ठाकूलला कोरोनाची लागण; इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून दिली माहिती
Mrunal Thakur : बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण झाली आहे.(photo:mrunalthakur/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृणालचा 'जर्सी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणालने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.(photo:mrunalthakur/ig)
मृणालने लिहिले आहे, मला कोरोनाची लागण झाली आहे. मला सौम्य लक्षणे जाणवत असून सध्या मी स्वत:ला आयसोलेटेड केले आहे.(photo:mrunalthakur/ig)
कार्तिक आर्यनच्या 'धमाका' सिनेमाच्या माध्यमातून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मृणालचा आगामी 'जर्सी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.(photo:mrunalthakur/ig)
शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय होऊ शकत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. (photo:mrunalthakur/ig)