Luka Chupi 2 चित्रपटाच्याच्या शूटिंगमध्ये वापरलेल्या बाईकच्या नंबरमुळे विकी कौशल अडचणीत?

vicky

1/7
आगामी 'लुका छुप्पी 2' चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) झळकणार आहेत.
2/7
या चित्रपटातील एक दृश्य चित्रित करण्यात आले आहे. त्या सीनमध्ये विकी कौशल सारा अली खानला बाईक रस्त्यावर फिरताना दिसत आहे.
3/7
या बाईकचा नंबर बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नंबर प्लेटच्या मालकाने सांगितले की, ''मी बातमीपत्रातही पाहिले की माझ्या गाडीच्या क्रमांकावर इतर कोणीतरी मोटारसायकल चालवत आहे. मी याची तक्रार केली आहे.''
4/7
विकी कौशल आणि सारा अली खान गेल्या अनेक दिवसांपासून इंदौर शहरात चित्रीकरणात व्यस्त आहेत. तेथे वेगवेगळ्या भागात चित्रपटाचे शूटिंग करत सुरु आहेत.
5/7
याच शूटिंगदरम्यान चित्रपटातील एक दृश्य शूट करण्यात आले होते. दृश्यात, विकी कौशल आणी सारा अली खानला बाईकवरून इंदौरमधील जवाहर मार्गावर घेऊन जातो. त्यानंतर तो व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. वृत्तपत्रामध्ये फोटो छापल्यानंतर, इंदौरच्या बाणगंगा भागातील सुंदर नगरमधील रहिवासी जयसिंग यादव यांनी दावा केला की, जी दुचाकी विक्की कौशलने चालवली होती, ज्याचा क्रमांक MP-09 UL 4872 आहे. त्यानंबरची स्कुटी त्यांनी 25 मे 2018 रोजी एरोड्रोम येथील शोरूममधून विकत घेतली. जे वाहन वापरले जात आहे ते बनावट आहे. चित्रीकरणात वापरलेला दुचाकीचा नंबर त्यांच्या स्कुटीचा आहे.
6/7
कार मालक जयसिंग यादव यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की, ''गाडीचा फोटो वृत्तपत्रात पाहिल्यानंतर त्यांच्या गाडीचा नंबर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये वापरण्यात येत असल्याचे समजले. हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्या वाहनाचा काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?.'' दरम्यान याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे. पोलिसांनी त्याआधारे तपास सुरु केला आहे.
7/7
पोलिस आयुक्त हरिनारायण चारी यांनी सांगितले की, 'जर कोणी वाहतुकीचे नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल. तसेच तपासाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल.'
Sponsored Links by Taboola