PHOTO: उर्फी जावेद साखळदंडात कैद, फॅशनच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहेत की उर्फीने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. उर्फीचा लेटेस्ट लूक समजून घेण्यासाठी चाहत्या चाहते चांगलेच गोंधळून गेले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फी जावेद पुन्हा एकदा फॅशन क्वीनच्या रुपात सार्वजनिक ठिकाणी पोहोचली आहे. यावेळी तिच्या स्टाईलने सर्वांनाच गोंधळात टाकले.
उर्फीने शेअर केलेल्या फोटोत तिने गळ्यात साखळदंड गुंडाळे आहेत. ती एवढ्यावरच थांबली नाही तर या साखळ्यांवर वेगवेगळ्या रंगांची छोटी कुलूपंही लटकलेली आहेत.
उर्फीने या साखळ्या तिचा पोशाख म्हणून बनवल्या आहेत. यावर तिने जाळीदार स्कर्ट कॅरी केला आहे.
उर्फी जावेदचा नवीन अवतार पाहिल्यानंतर तुम्ही तिचा पोशाख समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर थांबा कारण तुमचाही गोंधळ होऊ शकतो.
उर्फी जावेद या साखळदंडाच्या पोशाखात बॅकलेस टॉपमध्ये तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे.
उर्फीने लेटेस्ट लूकमध्ये तिचे केस पोनीटेल स्टाईलमध्ये बांधले आहेत. तसेच, तिने गुलाबी रंगाची लिपस्टिक कॅरी केली आहे.
उर्फी जावेदने पुन्हा एकदा आपल्या असामान्य लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.