Urfi Javed Photo : उर्फी जावेदवर मुंबई पोलिसांची कारवाई, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल
आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आता आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
उर्फी जावेदच्या एका व्हिडीओवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत तिच्या विरोधात भा.दं.वि कलम 171, 419, 500, 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे.
उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये तिच्या तोकड्या कपड्यांमुळे पोलिसांनी तिला अटक केल्याचं दिसत आहे.
स्वस्त प्रसिद्धीसाठी कुणीही कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, संबंधित पोलिसांचे सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
तो व्हिडिओ लोकांना खरा वाटला त्यामुळे संपूर्ण देशात व जगात महिलांनी अपुरे कपडे घालण्यास मुंबई पोलीस हे अटक करतात असा संदेश गेल्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या व्हिडीओतील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक केली, तसेच त्यामध्ये वापरण्यात आलेले वाहन जप्त केलं.
पोलिसांचा गणवेश वापरून उर्फी जावेदन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.