Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर, म्हणाली, 'माझ्या मुलाने माझं जीवन अर्थहीन बनवलं'
Trisha Krishnan Pet Death : बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे संपूर्ण जग ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे त्रिशा कृष्णनने तिच्या प्रिय मुलाला गमावलं आहे.
अभिनेत्री त्रिशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी शेअर केली आहे. तिने प्रिय कुत्र्याला गमावलं आहे.
ख्रिसमसच्या दिवशी सकाळी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्या प्रिय पाळीव कुत्रा झॉरो याचं निधन झालं आहे.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा कुत्रा झॉरो तिचा अत्यंत प्रिय होता. त्रिशा त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करायची.
आता झॉरोच्या जाण्याने तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.
त्रिशाने ख्रिसमसच्या सकाळी झॉरोच्या मृत्यूची बातमी शेअर केली. तिने झॉरोच्या दफनभूमीचा फोटो शेअर केला आहे.
त्रिशाने झॉरोच्या दफनभूमीवर फुले, मेणबत्त्या आणि हार घालून श्रद्धांजली वाहिली. तिने सोशल मीडियावर खास पोस्टही शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, 'माझा मुलगा झॉरोने ख्रिसमसच्या दिवशी सकाळी जगाला निरोप दिला. मला जवळून ओळखणारे लोक समजू शकतात की, माझं आयुष्य आता निरर्थक झालं आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटुंब सावरलेलो नाही. मी काही काळ कामातून ब्रेक घेत आहे,'
झॉरोच्या मृत्यूनंतर त्रिशाचे चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिचं सांत्वन करत आहेत.