Ank Jyotish : 'या' जन्मतारखेचे लोक नवीन वर्षात होणार मालामाल, फक्त एका गोष्टीची घ्या काळजी
Numerology New Year 2025 : नवीन वर्ष सर्वांसाठी सुख-समृद्धी घेऊन येईल, अशी सर्वांना आशा आहे. 2025 वर्ष प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन येईल. काही जण नोकरीच्या शोधात आहेत, काही प्रमोशनच्या शोधात तर, काही विवाह योग जुळण्याची वाट पाहत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, नवीन वर्षात काही लोकांचं नशीब चांगलंच फळफळणार आहे. या जन्मतारखेच्या लोकांवर पैशांचा जणू वर्षाव होणार आहे.
या मूलांकाचे लोक नव्या वर्षात मालामाल होतील. अंकशास्त्रानुसार, 2025 वर्षाचा मुलांक 9 आहे. मूलांक 9 चा स्वामी मंगळ आहे.
मंगळ हा आक्रमक आणि वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. मंगळ हा ग्रह धैर्य, समृद्धी, अग्नि, ऊर्जा, क्रोध यावर प्रभुत्व असणारा ग्रह मानला जातो.
अंकशास्त्रानुसार, 2025 वर्षात मुख्यतः 2, 9, 1 आणि 5 अंकांवर विशेष प्रभाव पडणार आहे. या वर्षी तुम्ही राग आणि वाद टाळले तर तुमची बहुतांश कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतात.
मंगळ ग्रह चंद्राचा अनुकूल ग्रह मानला जातो. मूलांक 2 चा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक 2 च्या लोकांसाठी उत्तम ठरणार आहे.
त्यामुळे नवीन वर्षात मूलांक 2 असलेल्या लोकांच्या जीवनावर एकीकडे मंगळाच्या ऊर्जेचा प्रभाव असेल तर दुसरीकडे चंद्राच्या कोमलतेचाही प्रभाव असेल.
मूलांक 2 म्हणजेच 2, 11, 20, 29 रोजी जन्मलेल्या लोकांच्या जीवनात नवीन वर्षात काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बदल दिसून येतील.
नवीन वर्ष मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करणारे ठरू शकते. व्यापार आणि नोकरदारांसाठी सकारात्म राहील.
या जन्मतारखेच्या लोकांना 2025 वर्षात यश, पैसा आणि नोकरी या दृष्टिकोनातून चांगल्या संधी मिळतील आणि अचानक यश आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
लेखन, अभिनय, नृत्य, पर्यटन, प्रवास, प्राणी, व्यवसाय, धान्य, फळे, फुले, दूध, दही, तेल उत्पादने, औषधोपचार, दंतचिकित्सा इत्यादींशी संबंधित लोकांसाठी 2025 हे वर्ष विशेषतः यशस्वी ठरेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.