Deepika Padukone | दीपिका पादुकोण प्रत्येक लूकमध्ये उठून दिसते; तिचे 5 बेस्ट ट्रेंडी आणि स्टाईलिश लुक पाहा
एका अॅवॉर्ड शोसाठी दीपिका पादुकोणने जबरदस्त भरतकाम असलेली आकर्षक साडी परिधान केली होती. रफल नेकलाइन आणि शिफॉन फ्लोर-स्वीपिंग ओढणीने या सुंदर पोशाखाला हटके लूक दिलाय. दीपिकाने स्लीक बॅक हेयरडू आणि डार्क लिपस्टिकसोबत याला पूर्ण केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरफेक्ट रेट्रो लूकसाठी दीपिकाने ऑल लेदर लूक निवडला होता. तिने फुल-स्लीव्ह लेदर टॉपसह स्कीनी लेदर पँट घातली होती. या अभिनेत्रीने आपला रेट्रो लुक ब्लॅक पंप्स, गोल्ड हूप्स आणि तिच्या स्लीक केशभूषाने स्टाईल केलेला.
फक्त कपडे आणि गाऊनच नाही तर दिवा देसी पोशाखदेखील स्टाईलने कॅरी करते. तिने एक चमकदार निळी सब्यसाची साडी परिधान केली. या चमकदार साडीला अभिनेत्रीने ग्लॅमरस लूक दिला. दीपिकाने साइड-पार्टेड वेट हेयरडू आणि न्यूड ओठांनी लूक पूर्ण केला होता.
दुसर्या रेड कार्पेट इव्हेंटसाठी दीपिकाने डिझायनर अनामिका खन्नाचा ऑल ब्लॅक आउटफिट परिधान केला होता. याला क्लासिक ट्विस्ट देऊन तिने मोत्याचा हार आणि झुमक्यासह पेअर केले होते.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी दीपिका पादुकोणने हा रेड गाऊन परिधान केला होता. जो तिने तिच्या आवडत्या स्लीक हेयर स्टाइलसह पेअर केला होता. तिच्या लूकमध्ये स्मोकी डोळे, रेड लिप्स आणि स्टेटमेंट इयररिंग्ज होत्या. (सर्व फोटो - दीपिका सोशल मीडिया)