बॉलिवूडच्या या महिला गायिका ग्लॅमरस लूकमध्ये सुंदर अभिनेत्रींवर आहेत भारी

बॉलिवूडमध्ये अनेक महिला गायिका अशा आहेत, ज्यांचा ग्लॅमरस लूकसमोर सुंदर अभिनेत्रीही फिक्या पडतील. या गायिकांचा सोशल मीडियावर मोठा फॅन फोलोविंग आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गायिकांची माहिती देणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अदितीसिंग शर्माने तिच्या संगीत कारकीर्दीची सुरूवात अनुराग कश्यपच्या देव डी चित्रपटापासून केली होती. तेव्हापासून तिने हिंदी चित्रपटात अनेक गाणी गायली आहेत. दरम्यान, 2019 पासून ती कोणत्याही चित्रपटासाठी गायलेली नाही.(photo : @adtsinghsharma instagram)

नेहा कक्कर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या गायकांपैकी एक आहे. रोहनप्रीत सिंगसोबत लग्नानंतर हे जोडपे अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. टोनी आणि सोनूसारख्या तिच्या भावंडांप्रमाणेच नेहा कक्कर भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात मोठी व्यक्ती ठरली आहे. नेहा जितकं चांगलं गाते तितकीच दिसतेही सुंदर.(Photo : @nehakakkar instagram)
सलमान खानच्या चित्रपटात 'जग घुमेया' हे गाणे गाऊन लोकप्रिय झालेली नेहा भसीन तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे बर्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहा भारतातील पहिल्या ऑल गर्ल्स बँड व्हिवा गर्ल्सची सदस्यही आहे.(Photo : @nehabhasin4u instagram)
निती मोहनला स्टुडंट ऑफ द इयर मधील इश्क वाला लव या गाण्याने प्रसिद्धी मिळाली होती. शक्ती आणि मुक्ति या आपल्या दोन बहिणींप्रमाणेच निती सोशल मीडियावरही बरीच चर्चेत आहे. इंडियन आयडल 11 या सिंगिंग रियलिटी शोची ती जज राहिली आहे.( photo : @neetimohan18 instagram)
शाल्मली खोलगडेने इशाकजादे या चित्रपटात गायल्यापासून प्रत्येक घरात तिचे नाव पोहचले आहे. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये बरीच गाणी गायली आहेत. तिच्या आवाजाशिवाय सोशल मीडियावर आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ती लोकप्रिय आहे.(Photo: @shalmiaow instagram)