Urvashi Rautela Pics: मनोज कुमारच्या नातीच्या लग्नात उर्वशी रौतेला नेसली 58 लाखांची गुजराती पटोला साडी; पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या लूकसाठी ओळखली जाते. ती नेहमी फॅशनला प्राधान्य देते. अलीकडेच तिचा नवा लूक समोर आला आहे. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती रेड कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्वशीचा पारंपारिक लूक दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्वशीचा अभिनेता ते राजकारणी झालेल्या मनोज कुमारची नात मुस्कान गोस्वामी हिच्या प्री-वेडिंगला उपस्थित होती.(Photo : @urvashirautela instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेहंदीच्या कार्यक्रमासाठी उर्वशीने गुजराती पटोला साडी परिधान केलीय. डिझाइनर आशा गौतम यांनी ही खास बनवली आहे.(Photo : @urvashirautela instagram)
या ड्रेससह तिने सोन्याचे दागिने घातले असून छान मेकअप केला होता.(Photo : @urvashirautela instagram)
उर्वशीने मल्टीकलर साडी परिधान केली आहे, ज्यासोबत ब्लू ब्लाउजचे कॉम्बिनेशन हटके दिसत आहे. उर्वशीच्या या साडीची किंमत तब्बल 58 लाख असल्याचे सांगितले जात आहे.(Photo : @urvashirautela instagram)
ही छायाचित्रे शेअर करताना उर्वशीने एक कॅप्शनही लिहिले आहे, पहिल्या फोटोत तिने असे कॅप्शन लिहिले आहे की, 'फक्त मेहंदीच नाही, तुमच्या प्रेमाचा रंग चढलाय, पिया, आता हा रंग जन्मभर जाणार नाही, यासाठी प्रार्थना करेन'(Photo : @urvashirautela instagram)
दुसऱ्या फोटोबरोबर तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मेहंदी का रंग चढ़ा ऐसे मेरे हाथों में, जैसे तेरा इश्क चढ़ा है मेरी सांसों में.(Photo : @urvashirautela instagram)
उर्वशीचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(Photo : @urvashirautela instagram)
या फोटोंवर उर्वशीचे चाहते प्रतिक्रियांचा पाऊस पाडताना दिसत आहे.(Photo : @urvashirautela instagram)