BMW 5 Series Photos : बीएमडब्लूची नवी 5 सीरिज भारतात लॉन्च, पाहा फीचर्स आणि किंमत
बीएमडब्लूची (BMW) नवी 5 सीरिज आज भारतात लाँच करण्यात आली आहे. नवी कार तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोलमध्ये (BMW 530i M Sport) आणि दोन डिझेल कार (BMW 530d M Sport and BMW 520d Luxury Line) उपलब्ध आहेत. आजपासून सर्व बीएमडब्ल्यू डीलरशिपवर या कार बुकिंग करता येणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनव्या टेक्नॉलॉजीने सज्ज या कारमध्ये रिमोट कंट्रोल पार्किंग, बीएमडब्ल्यू हेड-अप डिस्प्ले, रिव्हर्सिंग असिस्टंट, पार्किंग असिस्टंट अशा अनेक ड्रायव्हर्स असिस्टंट सिस्टम आहेत.
नव्या लूकमध्ये बीएमडब्लूची ओळख असलेली समोरील ग्रिल मोठी आणि रुंद देण्यात आली आहे. हेडलॅम्प्सच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात आले आहेत.
इंजिनबाबत बोलायचं तर BMW 530d M Sport and BMW 520d Luxury Line मध्ये डिझेल इंजिन आहे. तर BMW 530i M Sport मध्ये पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये चार सिलेंडर इंजिन आहेत जे 252 एचपी आणि 350 एनएम पावर जनरेट करतात. अवघ्या 6.2 सेकंदात ही कार 0-100 किमी स्पीड घेते.
बीएमडब्लूच्या या नव्या 5 सीरिजमध्ये इंटिरियर क्वालिटीदेखील शानदार आहे. आतमध्ये 12.3 इंचाची मोठी स्क्रीन आहे.
या कारच्या किमतीबाबत बोलायचं तर BMW 530i M Sport ची एक्स शोरुम किंमत 62,90,000 रुपये, BMW 520d Luxury ची किंमत 63,90,000 रुपये, तर BMW 530d M Sport ची एक्स शोरुम किंमत 71,90,000 रुपये आहे.