Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हॉकीवर आधारित या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास
खेळ हा भारतीयांचा आत्मा समजला जातो. बॉलिवूडमध्ये अनेक क्रीडा चित्रपट आले आहेत. खेळावर आधारीत चित्रपटांची कथा एकतर सत्य घटनेवर असते किंवा काल्पनिक असतात. बॉलिवूड स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी अनेकदा याचा फायदा घेत हॉकीवर चित्रपट बनवलेत. आज आम्ही तुम्हाला ते भारतीय चित्रपट सांगणार आहोत जे हॉकीवर आधारित आहेत, जे प्रेक्षकांना देखील आवडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमच्या या यादीतील पहिले नाव शिमित अमीन यांचा चित्रपट चक दे इंडिया. जो एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट हॉकीपटूच्या आयुष्याभोवती फिरतो. यात राष्ट्रीय महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक आहे, जो त्यांना विश्वचषक जिंकण्यास मदत करतो. या चित्रपटात शाहरुख खान महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता.
हरजीत हा विजय कुमार अरोरा दिग्दर्शित पंजाबी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा फिल्ड हॉकीपटू असलेल्या हरजितसिंगच्या जीवनावर आधारित आहे. तो अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय हॉकी संघाचा कर्णधार झाला होता.
रोहित जुगराजचा खिडो खुंडी हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, जो पंजाबच्या संसारपूरमधील हॉकीपटूंच्या जीवनाभोवती फिरतो. या चित्रपटाने भारताचा एक अज्ञात भाग समोर आणला जे गेममध्ये खूप चांगले आहेत. हा चित्रपट पंजाबी चित्रपट आहे.
गोल्ड चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती यांनी केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला. हा भारताच्या पहिल्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या प्रवासाभोवती फिरते, ज्याने 1948 मध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
दिलजीत दोसांझ अभिनीत सूरमा हा शाद अली दिग्दर्शित बायोपिक आहे जो हॉकीपटू संदीप सिंगच्या जीवनाभोवती फिरतो. या चित्रपटाची गाणी लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात तापसी पन्नू दिलजीत दोसांझसोबत पहायला मिळाली.