In Pics | जगाची पर्वा न करता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोड्या
मलायका आरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेयरची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा असते, मलायका ही अर्जुन कपूरपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे परंतु या दोघांमध्ये चांगली केमेस्ट्री जमलीय. हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्याचे बॉलिवूडचे हॉट कपल आहे. यांच्या प्रेमाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांनी आपल्या प्रेमाची कबुली जाहीरपणे दिली नसली तर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. अनेकवेळा हे दोघे एकत्र दिसून येतात.
सुश्मिता सेन गेले अनेक दिवस रोहमन शॉलला डेट करत आहे. त्यांच्या ब्रेक अपची चर्चा सुरू असताना या जोडीने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सत्य काय आहे ते सांगितले. रोहमन हा सुश्मिता सेनपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.
फुकरे चित्रपटाच्या निमित्ताने अली फजल आणि रिचा चढ्ढा एकत्र आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध वाढत गेले. लॉकडाऊनमुळे या जोडीने लग्न केलं नाही पण लवकरच यांच्या लग्नाची बातमी येणार असल्याची चर्चा आहे.
पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांनी आपल्या आपल्या प्रेमाची कबुली जाहीररित्या दिली आहे. त्यांच्या या प्रेमाची चर्चा सध्याचा हॉट टॉपिक आहे.