In Pics | प्रसिद्ध तामिळ अभिनेता विवेक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Continues below advertisement

Feature_Photo

Continues below advertisement
1/7
प्रसिद्ध तामिळ अभिनेता विवेक यांचे चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. शुक्रवारी त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते 59 वर्षाचे होते.
2/7
हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितलंय की, शुक्रवारी 100 टक्के ब्लॉकेज झाल्याने त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे त्यांची स्थिती नाजूक होती. मोठे प्रयत्न करुनही अभिनेता विवेक यांचा जीव वाचवण्यास हॉस्पिटल प्रशासनाला अपयश आले.
3/7
विवेक यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांवर आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
4/7
विवेक यांनी आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटांवर एक वेगळीच छाप उमटवली आहे. त्यांनी रजनिकांत, विजय, माधवन आणि अजित कुमार यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.
5/7
अभिनेता विवेक यांना त्यांच्या कॉमेडी अभिनयाबद्दल ओळखलं जायचं. त्यांच्या अभिनयातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2009 साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
Continues below advertisement
6/7
विवेक हे लोकांमध्ये पर्यावरणासंबंधी जाकरुकता निर्माण करण्यामध्ये आघाडीवर होते.
7/7
दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनाची लस घेतली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं होतं.
Sponsored Links by Taboola