Taapsee Pannu : बोल्ड फोटो शेअर केल्यानंतर तापसी पन्नू का ट्रोल होतेय?
तापसी पन्नू तिच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत असते. अलीकडेच तापसीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तापसीच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकत्याच झालेल्या 'लॅक्मे फॅशन वीक' (LFW) मध्ये, तापसी पन्नूने बोल्ड नेकलाइनसह हॉट रेड ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला. या ड्रेससोबत तिने हेवी डिझायनर नेकपीस घातला होता, ज्यावर लक्ष्मीची मूर्ती होती.
हा फोटो शेअर करताना तापसीने लिहिले आहे की, 'हा लाल रंग मला कधी सोडेल? मात्र या फोटोमुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं दिसून येतंय.
हा हिंदू धर्माचा 'अपमान' आहे अशा कमेंट्स त्यावर आल्या. तर बोल्ड लूकवर लक्ष्मीचा फोटो वापरणे म्हणजे देवीचा अपमान आहे असं काहींनी म्हटलंय. अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स तापसीच्या या लूकवर आल्या आहेत.
याआधीही तापसी पन्नूने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूने ब्लू कलरच्या साडीमध्ये फोटोशूट केले होते. ही छायाचित्रे शेअर करताना तापसीने लिहिले होते, 'पंडित जी म्हणतात, ना चलन से ना चाल से, प्यार करणे वालोंको परखो उनके दिल से.'
तापसीच्या या फोटोंवरही नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या. अजूनही ते फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.