Movies: दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; जाणून घ्या कलेक्शनबाबत...
सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीला रिलीज होत आहे. अनेक फिल्म मेकर्स त्यांचा चित्रपट दिवळीत रिलीज करण्याचा निर्णय घेत असतात. जाणून घेऊयात अशा चित्रपटांच्या कमाईबद्दल जे दिवळीत रिलीज झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट 2021 च्या दिवाळीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 195 कोटींची कमाई केली.
'सूर्यवंशी' या चित्रपटात अक्षयसोबतच कतरिना कैफनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगण यांचा कॅमिओ होता.
'हाऊसफुल 4' हा चित्रपट 2019 च्या दिवाळीला रिलीज झाला होता. या चित्रपटाने 205 कोटींची कमाई केली होती.
सलमान खान आणि सोनम कपूर यांचा'प्रेम रत्न धन पायो' हा चित्रपट देखील दिवाळीत थिएटरमध्ये दाखल झाला होता. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता.
सलमानच्या 'प्रेम रत्न धन पायो' या चित्रपटाने 218 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा 'ए दिल है मुश्किल' हा चित्रपट देखील 2016 मध्ये दिवाळीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 106 कोटींची कमाई केली.
हृतिक रोशालचा 'क्रिश' हा चित्रपटही 2013 साली दिवाळीत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 209 कोटींची कमाई केली होती.
अभिनेता अजय देवगणचा 'गोलमाल अगेन' हा चित्रपट देखील 2017 मध्ये दिवाळीत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी 205 कोटींची कमाई केली होती.
परिणीती चोप्रा,अर्शद वारसी,कुणाल खेमू, तब्बू,श्रेयस तळपदे यांनी 'गोलमाल अगेन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.