Sunil Grover : कोट्यवधींच्या घरात राहतो 'डॉ. मशहूर गुलाटी'! पत्नीनेचं केलंय डिझाइन; पाहा कॉमेडियन सुनिल ग्रोवरच्या आलिशान घराचे Inside Photo
विनोदवीर सुनिल ग्रोवर सध्या चर्चेत आहे. लवकरच तो कपिल शर्मासोबत एका नव्या विनोदी कार्यक्रमात दिसणार आहे. या कार्यक्रमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनिल ग्रोवरने नुकतीच त्याच्या आलिशान घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सुनिलने 2013 मध्ये मुंबईत तीन कोटी रुपयांत एक आलिशान घर विकत घेतलं आहे.
सुनिलच्या घरात स्टेयर केस ते सीटिंग एरियापर्यंत लाकडाचा वापर करण्यात आला आहे.
घरातील भिंतीवर फ्लोरल चित्र काढण्यात आलं आहे. घरातील प्रत्येक वस्तू छान पद्धतीने सजवण्यात आली आहे.
लिविंग रुमजवळ डायनिंग टेबल आहे. सुनिल ग्रोवरचा हा लाडका कॉर्नर आहे.
सुनिलच्या घरात एक गेम कॉर्नरदेखील आहे. मोकळ्या वेळेत खेळ खेळायला तो प्राधान्य देतो.
सुनिलच्या बालकनीतून मायानगरी मुंबईचा एक सुंदर नजारा दिसतो. तसेच त्याने छान झाडेदेखील लावली आहेत.
सुनिलला वाचनाची आवड आहे. त्याच्या घरी विविध प्रकारची पुस्तके आहेत. सुनीलचं हे घर त्याच्या पत्नीने डिझाइन केलं आहे.
सुनिलच्या स्वयंपाकघराची रचना उत्तम करण्यात आली आहे.