केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कांद्याच्या निर्यातीवर बंदी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban Onion Export) घातली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं आहे.
मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणा आंदोलन सुरु केली आहेत.
केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतला आहे.
. सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत.
नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई - आग्रा महामार्ग रोखला आहे.
एकीकडे अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजा होरपळला आहे. शेतकऱ्याला हिवाळी अधिवेशना दरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारवर टीका
31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.