PHOTO : 'या' बॉलिवूड कलाकारांची बालपणीच्या साथीदारासोबत लग्नगाठ, फोटोंमध्ये पाहा कोण आहेत हे सेलिब्रेटी

सुनील शेट्टी: टीनएजर असताना सुनील शेट्टीनं एका पेस्ट्री शॉपवर माना शेट्टीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्या बहिणीनं मानासोबत मैत्री करुन दिली. त्यानंतर त्यांची दोस्ती प्रेमात रुपांतरीत झाली. मात्र लग्नाच्या वेळी धर्म वेगवेगळे असल्यानं परिवाराकडून मोठा विरोध झाला. अखेर 9 वर्षांनंतर दोघांचं लग्न झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऋतिक रोशन: टीनएजमध्ये ऋतिक रोशन सुजैनला पहिल्यांदा पाहताच प्रेमात पडला होता. मग दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं. मात्र 2013 मध्ये त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली.

आयुष्मान खुराना: आयुष्मान आणि ताहिरा एकमेकांना शालेय जीवनापासून ओळखतात. दोघांचे परिवार देखील एकमेकांना चांगले ओळखायचे. त्यामुळं त्यांच्या लग्नासाठी काही अडचण आली नाही. या दोघांना दोन मुलं आहेत.
शाहरुख खान: शाहरुख खाननं गौरीला वयाच्या 16 व्या वर्षी पाहिलं होतं. त्यावेळी गौरी 14 वर्षांची होती. एका पार्टीत गौरीला पाहताच शाखरुख प्रेमात पडला. धर्म वेगवेगळे असल्यानं त्यांच्या लग्नासाठी अडचणी आल्या मात्र त्यांनी 1991 मध्ये लग्न केलं.
वरुण धवन: वरुणनं नुकतचं आपली बालपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत लग्न केलं. वरुण आणि नताशा एकमेकांना 6 व्या वर्गात असल्यापासून ओळखतात.
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या प्रेमकहाण्या खूप जबरदस्त आहेत. आज आपण अशा काही जोड्यांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी आपल्या बालपणीच्या प्रेमालाच आयुष्यभराचा साथीदार बनवलं. या सेलिब्रेटीच्या लिस्टमध्ये वरुण धवन, शाहरुख खान, आयुष्मान खुराना, ऋतिक रोशन, सुनील शेट्टी यांची नाव आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -