In Pics : काश्मिरमधील गुलमर्ग येथे देशातील पहिले इग्लू कॅफे, पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2021 06:03 PM (IST)
1
यंदा काश्मिरच्या थंडीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. बर्फवृष्टीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु या बर्फाचा वापर करत चक्क एका व्यक्तीने अनोखे इग्लू कॅफे बनवले आहे.
2
हे इग्लू कॅफे आतील बाजूने 22 फूट रूंद आणि १३ फूट उंच आहे. तर बाहेरील बाजूने 24 फूट रूंद आणि 15 फूट उंच आहे.
3
कॅफेचे मालक वसीम शाह म्हणाले, इग्लू बनवण्यासाठी मला 15 दिवस लागले. यामध्ये 16 जणांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. केवळ 15 दिवसात 20 मजुरांनी हा कॅफे उभारला आहे
4
आशिया खंडातील हा सर्वात मोठा पहिला आइस कॅफे असल्याचा दावा वसीम शाह यांनी केला आहे. त्यामुळे याची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये होईल, अशी आशा शाह यांना आहे.
5
हॉटेल नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हे इग्लू कॅफे पाहण्यासाठी येतील, असेही कॅफे मालक वसीम शाह म्हणाले.