Year Ender 2024: 'कल्कि 2898 एडी'पासून 'पुष्पा 2'पर्यंत; 2024 मध्ये 'या' साऊथ फिल्म्सचा डंका, बॉक्स ऑफिसवरही धुवांधार कलेक्शन
विजय थलापतीचा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटानं भारतात एकूण 252.59 कोटींची कमाई केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटानं रिलीजच्या एका आठवड्यातच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 650 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. चित्रपट अजूनही पडद्यावर आहे आणि त्यामुळे त्याचे कलेक्शन वाढू शकते.
'मंजुम्मेल बॉयज'चं बजेट केवळ 20 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. Sacknilk च्या मते, चित्रपटानं 141.61 कोटींची कमाई केली आणि तो हिट ठरला.
25 कोटी रुपये खर्चून बनलेला 'आदुजीवितम: द गोट लाइफ' हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटानं भारतात 85.01 कोटी रुपयांची कमाई केली होती.
दुलकर सलमानचा 'अमरन' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. या चित्रपटानं 219.23 कोटींची कमाई करून हिट लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे.
या वर्षातील ब्लॉकबस्टर साऊथ चित्रपटांमध्ये प्रभासचा 'कल्की 2898 एडी' अव्वल आहे. 500 कोटींचे बजेट असलेल्या या साय-फाय चित्रपटाचं कलेक्शन 646.31 कोटी रुपये होतं.
तेजा सज्जाच्या 'हनुमान'चं बजेट फक्त 40 कोटी रुपये होतं. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 201.63 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो सुपरहिट ठरला.