Vidya Balan Sister: विद्या बालनची बहीण आहे, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; पण दोघी आयुष्यात एकमेकींना फक्त दोनदाच भेटल्यात...
विद्या बालन बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून सक्रीय आहे, पण फार कमी लोकांना माहीत आहे की, अभिनेत्रीची एक बहीण देखील आहे, जिचं दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे. ही सौंदर्यवती नात्यानं विद्या बालनची बहीण लागते. पण, दोघी आयुष्यात फक्त दोनदाच भेटली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री प्रियामणीनं अलिकडेच विद्या बालन तिची चुलत बहीण असल्याचा खुलासा केला आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणीनं सांगितलं होतं की, ती आणि विद्या चुलत बहिणी आहेत.
प्रियामणी म्हणाली की, आम्ही चुलत बहिणी आहोत. माझे आजोबा आणि त्यांचे आजोबा भाऊ-भाऊ आहेत. त्यांचे आजोबा हे, माझ्या आजोबांचे मोठो भाऊ होते. आजपर्यंत मी त्यांना दोनदाच भेटले आहे.
याबाबत सांगताना प्रियामणीनं विद्या बालनसोबतच्या दोन भेटींबाबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. ती म्हणाली की, एक अवॉर्ड सेरेमनी होती, मला धुसरं आठवतंय की, कदाचित विजागमध्ये होती, जिथे त्या देखील आल्या होत्या. मला वाटतंय की, त्यांनी एनटीआर सरांच्या लाईफवर एक तेलगु फिल्म केली होती, त्यासाठीच ती त्या अवॉर्ड फंक्शनला आली होती.
प्रियामणी पुढे बोलताना म्हणाली की, ज्यावेळी त्यांना समजलं की, मीसुद्धा तिथेच आहे, त्यावेळी त्यांनी मला अवॉर्ड दिलं, जे नेमकं कशासाठी दिलं तेसुद्धा मला आठवत नाही.
प्रियामणी म्हणाली की, अवॉर्ड फंक्शनमध्ये मी पहिल्यांदा विद्या बालनला स्टेजवर पाहिलं होतं. ती म्हणाली की, त्या खरंच खूप सुंदर आहेत. मला आठवतंय की, ज्यावेळी त्या मला भेटलेल्या त्यावेळी त्यांनी मला विचारलं होतं की, प्रिया तू कशी आहेस? त्यावर मी म्हणालेली , मी छान आहे, तुम्ही कशा आहात? त्यावेळी आम्ही एकमेकींना मिठी मारली होती.
मुलाखतीवेळी प्रियामणीनं सांगितलं की, विद्या बालनसोबत तिची दुसरी भेट शाहरुख खानच्या एका पार्टीमध्ये झाली होती.
दरम्यान, दाक्षिणात्या अभिनेत्री प्रियामणीनं शाहरुख खानसोबत फिल्म 'जवान'मध्ये स्क्रिन शेअर केली होती. यापूर्वी ती फिल्म 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये तिच्यासोबत दिसली होती.