भारताचा न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव का झाला? ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टननं एका वाक्यात कारण सांगितलं...
भारतीय क्रिकेट संघाला नुकत्याच पार पडलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडनं तीन कसोटी सामने जिंकले. तिसऱ्या कसोटीत भारताला 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रिलयाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं भारताच्या पराभवाचं कारण एका वाक्यत सांगितलं आहे. भारतीय कसोटी संघ थकलेला होता हे पाहायला मिळालं.
भारतीय क्रिकेट संघ सातत्यानं क्रिकेट खेळत असल्यानं मानसिक थकवा आल्यानं ते चुकीचे फटके मारुन बाद झाले, असा अंदाज क्लार्कनं वर्तवला.
मायकल क्लार्कनं अराऊंड द विकेट पॉडकास्टमध्ये म्हटलं की न्यूझीलंडचा संघ विजयाचा मानकरी आहे. मात्र, भारतीय संघ थकलेल्या स्थितीत होता. त्यांनी काही चुकीचे फटके मारणे, गोलंदाजांचा प्रभावी वापर झाला नाही. त्यानंतर रोहितची प्रतिक्रिया यातून खेळाडू थकलेले असल्याचं दिसून आल्याचं क्लार्क म्हणाला.
भारतीय संघ आत्मविश्वासानं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येईल, असंही मायकल क्लार्कनं म्हटलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करतील, असा विश्वास देखील मायकल क्लार्कनं व्यक्त केला.