लॉकडाऊनमध्ये सोनाक्षी सिन्हा आणखी फिट; फोटो पाहून तुम्हालाही ओळखणार नाही

सर्व सेलिब्रिटींना लॉकडाऊनमध्ये घरातच राहावे लागत आहे. प्रत्येकजण स्वत: नुसार या मोकळ्या वेळेचा आनंद घेत आहे. काही विश्रांती घेत आहेत तर काहींना आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा लोकांच्या यादीत सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)हिचे नाव आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लॉकडाउनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेत सोनाक्षी आपल्या तब्येतीकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसत आहे. कारण तिने नुकतीच शेअर केलेली काही छायाचित्रे ओळखणे कठीण होत आहेत. (फोटो - सोशल मीडिया)

सोनाक्षी सिन्हाने आज तिच्या इंस्टा स्टोरीवर फोटो शेअर केला आहे. यात तिच्यामध्ये आश्चर्यकारक बदल दिसत आहे. या फोटोमध्ये बॅक पोझ देणारी सोनाक्षी ओळखू येत नाहीय. या फोटोत ती योगा करताना दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
यापूर्वीही सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सडपातळ आणि फिट दिसत आहे, म्हणजेच लॉकडाउनमध्ये जिममध्ये सोनाक्षीने खूप घाम गाळला आहे. तिचे वजन कमी झालेले स्पष्ट दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
सोनाक्षीने हा फोटो शेअर करताना लिहलंय, की जेव्हा तुमच्या वर्क फ्रॉम होमचा अर्थ आहे वर्कआउट फ्रॉम होम. वर्कआउट करताना सोनाक्षीने एक फोटोही शेअर केला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
सोनाक्षी सिन्हा यावर्षी डिजिटल डेब्यू करणार आहे, ती अॅमेझॉन प्राइमच्या वेब सीरीज फॉलेनमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये ती सशक्त पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्याचवेळी अजय देवगन आणि अनेक स्टार्स असलेल्या - द प्राइड ऑफ इंडिया यातही सोनाक्षी महत्वाची भूमिका साकारणार आहे. (फोटो - सोशल मीडिया)