In Pics: लक्झरी कार, आलिशान बंगला; सचिनच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा ऐकून थक्क व्हाल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्तानं सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन सध्या एक निवृत्त खेळाडू आहे. पण, इतर खेळाडूंप्रमाणं प्रशिक्षक किंवा समालोचक होण्याचा मार्ग त्यानं निवडला नाही. याउलट त्यानं वैयक्तिक जीवनावर आणि कुटुंबावर लक्ष देण्याला प्राधान्य दिलं.
वयाच्या 16 व्या वर्षापासून क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आलेल्या सचिननं आपल्या आजवरच्या कारकिर्दीत 100 शतकं झळकावण्याची किमया केली.
सचिनला लक्झरी जीवनशैली जगण्याची आवड आहे. आंत्रप्रन्योर डॉट.कॉमच्या माहितीनुसार त्याचं वार्षिक उत्पन्न 1250 कोटी रुपये म्हणजेच 170 मिलियन डॉलर इतकं आहे.
सचिन असा पहिला क्रिकेटपटू आहे, ज्यानं MRF या ब्रँडसह 2001 मध्ये 100 कोटींचा करार केला होता. याव्यतिरिक्तही तो इतरही ब्रँडच्या जाहिराती करतो. ज्यामधून त्याला वर्षभरात 17 ते 20 कोटी रुपये मिळतात.
मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात असणाऱ्या पेरी क्रॉस रोड येथे सचिनचा बंगला आहे. 2007 मध्ये त्यानं हा बंगला 39 कोटी रुपयांना खरेदी केला होता. 6000 चौरस फुटांच्या या बंगल्याला 1926 मध्ये उभारण्यात आलं होतं.
सचिनकडे अनेक आलिशान लक्झरी कारही आहेत. ज्यामध्ये फरारी 360 मोडेना, बीएमडब्ल्यू आय8, बीएमडब्ल्यू एम6 यांचाही समावेश आहे.