Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर… ती आली… तिने पाहिलं… ती लढली आणि ती स्वत:च्या पायावर उभी राहिली…
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्धाच्या कामाची दखल घेत तिला 'माझा सन्मान पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.
दिग्गज अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी एवढ्यापुरतंच मर्यादित न राहाता तिने बॉलिवुडमध्ये स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
आशिकी 2 मधल्या आरोहीनं प्रेमाची वेगळीच व्याख्या रसिकांसमोर ठेवली.
एक व्हिलन मधली आयेशा हूरहूर लावून गेली.
स्त्री मधल्या नाव नसलेल्या भूमिकेनं तिला सिनेविश्वात नवी ओळख मिळवून दिली.
आज दोन डझनाहून अधिक सिनेमे श्रद्धा कपूरच्या नावावर आहेत.
आई वडिलांकडून श्रद्धाला अभिनयाचा समृद्ध वारसा मिळाला असला तरी आजोबांचं गाणंही तिनं आपलसं केलं.
अभिनय ही तिची पॅशन असली तरी गाणं हे तिचं प्रेम आहे.
कोल्हापुरेंचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्ट्रीत स्वत:चा ठसा उमटवते आहे.