Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला बहिणीला द्या खास गिफ्ट, जीवनभर मिळेल आर्थिक सुरक्षा; जाणून घ्या सविस्तर...
भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी रक्षाबंधनाच्या सणाला खूप महत्त्व आहे. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या बहिणीला खास आर्थिक भेट देऊ शकता. (PC:istok)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात भेटवस्तूंचे अनेक पर्याय असले तरी खास आर्थिक भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या बहिणीचे भविष्य सुरक्षित करू शकता. (PC:istok)
या भेटवस्तूंद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकता. यासोबतच तिचं भविष्यही उज्ज्वल करू शकता. (PC:istok)
तुमच्या बहिणीचे बचत खाते नसेल तर, आजच कोणत्याही बँकेत तिच्या नावाने बचत खाते उघडा. (PC:istok)
बचत खात्यात दरमहा थोडी रक्कम जमा करून तुम्ही तिला संकटकाळी उपयोगी येईल अशी खास भेट देऊ शकता. (PC:istok)
बचत खाते उघडण्याव्यतिरिक्त तुम्ही बँकेच्या एफडी योजनेतही गुंतवणूक करू शकता. वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाइटला भेट द्या आणि तुम्हाला जास्त व्याजदराचा लाभ कुठे मिळत आहे ते पाहा, त्यानुसार तुम्हांला गुंतवणूक करता येईल. (PC:istok)
तुमच्या बहिणीला स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. ही गुंतवणूक तुमच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मोठा निधी तयार करण्यास फायदेशीर ठरेल. (PC:istok)
याशिवाय बहिणीला आरोग्य विमा पॉलिसी भेट देणे, हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमच्या बहिणीला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयाच्या बिलाची चिंता करावी लागणार नाही. (PC:istok)
जर तुम्हाला तुमच्या बहिणीला सोने भेटवस्तू द्यायचं असेल, तर सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त तुम्ही डिजिटल गोल्ड तसेच, गोल्ड ईटीएफ इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता. (PC:istok)
याशिवाय, सुकन्या समृद्धी योजना किंवा PPF सारख्या सरकारी योजनेंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या बहिणीला एक खास आर्थिक भेट देऊ शकता. (PC:istok)
त्यामुळे यंदा रक्षाबंधनला बहिणीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? (PC:istok)