In Pics : भूज ते शेरशाह लवकरच रिलीज होणारे रिअल लाईफ सिनेमे
बॉलिवूडमध्ये लवकरच अनेक उत्कृष्ट चित्रपट पाहायला मिळणार आहेत. अजय देवगणच्या 'भुज'पासून सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'पर्यंत, येणाऱ्या काळात अनेक रिअर लाईफ चित्रपट रिलीज होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजय देवगण स्टारर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चा ट्रेलर 12 जुलै रोजी लाँच करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर, फॅन्स चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अजय देवगण या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे.
अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' हा चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. 2019 मध्ये, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ज्याचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत आणि चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहे. अक्षय या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे.
'थलाइवा' हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तयारी जोरात सुरू आहे.
गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा तुफान हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. बॉलिवूडमध्ये खेळांची क्रेझ आहे कारण बॉलिवूडमध्ये असे अनेक क्रीडा चित्रपट आहेत जे प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. अजय देवगणचा आगामी चित्रपट मैदान 1952-1962 दरम्यानच्या भारताच्या फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कथा सांगणार आहे. यामध्ये अजय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रियामणी आणि गजराज राव देखील आहेत आणि 15 ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज होणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा शेरशाह हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. याआधी 25 जुलै रोजी करण जोहर निर्मित 'शेरशाह' चित्रपटाचा ट्रेलर द्रासमध्ये प्रदर्शित झाला होता. शेरशाह कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित आहे.
1983 क्रिकेट विश्वचषकावर आधारित 83 हा चित्रपट बऱ्याच काळापासून रिलीजची वाट पाहत आहे. गेल्या वर्षीच हा चित्रपट पूर्ण झाला. पण ओटीटी रिलीज ऐवजी चित्रपटगृहांमध्ये त्याच्या रिलीजची प्रतीक्षा केली जात होती. आता थिएटर उघडल्यानंतर चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येऊ शकेल.